रत्नागिरी : कोकणामध्ये येवू घातलेल्या विविध कंपन्या, शिवाय होणारे बदल, कंपन्यांना ज्या पध्दतीचे मनुष्यबळ हवे त्या पध्दतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठाची आवश्यकता आहे. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ८० महाविद्यालये आहेत. नव्याने दहा महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यातील महाडपासूनची काही महाविद्यालये एकत्र केली तर शंभर महाविद्यालयांना मिळून स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी करण्यात येत आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून संस्था चालक विद्यापिठ मागणी करणार आहेत.जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात सर्व संस्थाचालक, व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची एकत्रित बैठक रविवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोकण विद्यापीठाबाबत भेट घेण्याच निश्चित करण्यात आले.
कोकणवासीयांना हवे स्वतंत्र कोकण विद्यापीठ; संस्थाचालक घेणार मुख्यमंत्र्याची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 20:50 IST